पोलीस
पोलीस
सोडूनी आपुला कुटुंब कबिला
जन रक्षणा उभा ठाकला
चौका चौकात रस्त्या रस्त्यांवर
शिटी वाजवत फिरू लागला
बायको मुलांची आर्त पुकार
त्यागुनी आपुला सुखी संसार
संकटकाळी सदरक्षणाय
वर्दी मधुनी फिरे बेदरकार
कटू बोलतो काठी उगारतो
पण केवळ जनहितच पाहतो
वर्तन यांचे असे फणसापरी
वरुन काटेरी आत रसाळ भारी
जरी नाठाळांना मारी काठी
चारी भाकरी भुकेल्या ओठी
नच शत्रू ते तर आपुले मित्र खरे
आभाराचा क्षण एक त्यांना पुरे.