मी सैनिक भारतमातेचा...
मी सैनिक भारतमातेचा...


मी सैनिक भारतमातेचा...
जो सैनिक शत्रूशी दोन हात करतो
अन् त्याच्याच छावणीत घुसून ठार मारतो
मी सैनिक भारतमातेचा...
रात्रभर असो किंवा दिवस असो
लढण्यासाठी सदैव तप्तर असतो
मी सैनिक भारतमातेचा...
ऊन असो किंवा पाऊस असो
तरी स्वतःची पर्वा न करता देशाचे रक्षण करतो
मी सैनिक भारतमातेचा...
सुख असो किंवा दुःख असो
घरदार सोडून काळीज घट्ट करतो
मी सैनिक भारतमातेचा...
वेळ असो किंवा काळ असो
देशाच्या सीमेवर शत्रूच्या समोर उभा रहातो