बाप...
बाप...
माझा बाप शेतात राबुनी
धान्य पिकवतो
त्याला नसते स्वतःच्या घराची काळजी
त्याला असते माणसाची काळजी
दिस भर शेतात मर मर राबतो माझा बाप
मग मिळते आम्हा लेकरांना धान्य
उन्हात राहतो तो आम्हा लेकरांचा बाप
दिस जातो निघून तेव्हा मिळे आनंद
जगाचा पोशिंदा तोच
जो भर उन्हात आपला घाम गाळतो
उभ्या शेतात राबुनी माझा बाप
तेव्हा मिळते चटणी-भाकर
कष्ट करुनी हात पाय गळले
तेव्हा उमगते कष्टाची नवी जिद्द