या भारत देशा...
या भारत देशा...
जगात भारी भारत देशा
जागाचा कर्दनकाळ भारत देशा||
पाहा माझी ही भूमी
कशी आहे नवरत्नांची
खाण माझी ही भूमी
भारत देशा कणखर देशा||
कशी आहे पुण्यवान
ही भूमी हा भारत
माझा कसा उभा आहे
सन्मानाने देशास दिशा देई||
कित्येक पावन लोक झाले
ते माझ्या भारत देशात
येथे जन्मले भगतसिंग
आणि अण्णाभाऊ क्रांतिकारी थोर||
यांनी साहित्यातून दुःख
उपेक्षितांचे मांडले
अशी नवरत्नांची ही
भारत भूमी ठरली थोर||