रात्र...
रात्र...




चांदण्यांच्या शितलपणात
काही काव्य आहे...
चांदण्या रात्री आकाशाकडे बघून
ढगांच्या पलिकडचे जग पाहावं
कुशीत घेऊन तारे मोजावे...
धगधगत्या आयुष्यात
विसावा घ्यावा ज्वलंत
प्रेम असावे रात्रीसारखे...
अन्
आयुष्य असावे सूर्यासारखे
दवात भिजलेल्या फुलांच्या पाकळ्यांना
बिलगून आजचा दिवस
मावळला मावळला!