सकाळ...
सकाळ...

1 min

65
आकाश कितीही, उंच असो,
नदी कितीही सुंदर असो,
पर्वत कितीही विशाल असो,
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही कोवळी सकाळ......
इवली पाखरे किलबिल
करू लागली
हा पहाटेचा मंद मंद वारा
त्यामध्ये रातराणीचा परिमळ
सारा मनाला माझ्या
स्पर्शून गेला
जणू काही सांगून गेला.......
त्यामध्ये कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित........