STORYMIRROR

Shubham Yerunkar

Inspirational Others

3  

Shubham Yerunkar

Inspirational Others

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
252

माझी मराठीची बोली..

वर्षे अमृताने न्हाली..

माझ्या हृदयी रुजली..

माझी माय मराठी...!


किती सांगावी महती..

राकट रांगडी माती..

खेड्यापाड्यातली नाती..

माझी माय मराठी...!


किती सुंदर वलय..

जसे देवाचे आलय..

झुले सह्याद्री मलय..

माझी माय मराठी...!


जशी दुधातली साय..

तशी माझी मऊ माय..

तिचे वंदितो मी पाय..

माझी माय मराठी...!


तुला मला जोडणारी..

माझी मलाच भिडणारी..

माझ्या स्पंदनात अखंड धडधडणारी..

माझी माय मराठी...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational