पाऊस माझ्या मनातला...
पाऊस माझ्या मनातला...
पावसा पावसा, इतका का रागवलास तू
तुझ्याच लेकरांशी, का पारखा झालास तू
पाऊस माझ्या मनातला
तूच तो, बळीराजाचा श्वास
बघ सारे आतुरलेत, तुझ्या स्वागतास
पाऊस माझ्या मनातला
मेघ राजा, आता तरी बरस
वाट पाहून थकलो, देवा बोलू का रे नवस
पाऊस माझ्या मनातला
बघ तुजवीन तो, घेतोय गळफास
वाट पाहून थकलो रे, एक सर तरी येऊ दे
पाऊस माझ्या मनातला
दाखव दया, एक करुण हाक रे
पसरतो पाहा, त्यात टाक दान रे
पाऊस माझ्या मनातला