एकांत आठवण
एकांत आठवण


काळ केवढा लोटला, शरीर लागलंय थकायला
पल्ला गाठायची वेळ आली, वय लागलंय वाढायला
एवढ्या काळात, खूप काही बघितलंय अजून काही बाकी शिल्लक
पुन्हा बालपण मती मरावी, बुद्धी होती जी तल्लख
आधी स्वतःला नंतर सगळ्यांना, त्रास माझा होतोय
परमेश्वरा तूच सांग आता, प्राण केव्हा जातोय
मुक्ती ती खरी शरीराला, मागे आठवणींची लाट
आयुष्याला आयुष्याने, आज दाखवली पाठ
मोकळे सगळेच झालो, फक्त सुतक बाकी आहे
कामाच्या बोजाखाली, वेळ केव्हा सरते पाहे
काळच तो पुसून टाकेल, अस्तित्व सगळं माझं
एकांत आठवणीने माझ्या, मन मात्र दुखेल तुझं