आणखी थोडंसं जगून घ्यावं...
आणखी थोडंसं जगून घ्यावं...


मृत्यू दाराशी आल्यावर वाटलं
आणखी थोडंसं जगावं..
इतरांसाठी खूप जगलो
आता स्वतःसाठी जगावं....
दुसऱ्यांसाठी करताना
स्वतःला मात्र विसरून गेलो
दुःखितांना हसवण्यासाठी
स्वतः हसणं विसरून गेलो
दुसऱ्यांना प्रेम शिकवताना
स्वतः प्रेम करण राहून गेलं
विखूरलेल्याना सावरताना
स्वतः अस्तावस्त पडून राहिलो
दुसऱ्यांना दान देता देता
स्वतः मात्र भिकारी झालो
जिवंत असताना मरणाची
आतुरतेने वाट पाहत होतो
मरण दाराशी आल्यावर वाटतं
आणखीन थोडं जगून घ्यावं.... !