आठवतेय मला !
आठवतेय मला !


पहिला पाऊस
पहिली साथ,
मला बोलविण्यासाठी
तू घातलेली पहिली साद !
पहिल्या पावसात मातीचा
पहिला सुगंध,
तुझी सोबत
अशीच मद्यधुंद !
पहिल्या पावसात
पहिलं भिजणं,
तुझ्या गालावरून ओघळणाऱ्या
थेंबाला टिपण्यासाठी
माझं सरसावण!
पहिला वारा
पहिली हवा,
हवेनं उडणारी ओढणी
सावरताना तुझं लाजणे
....... आठवतेय मला !!!!