STORYMIRROR

Manish Raut

Romance Others

3  

Manish Raut

Romance Others

दिवसाची रात्र

दिवसाची रात्र

1 min
47

एकदा रात्र दिवसाला 

संध्याकाळी भेटली 

थोडीशी लाजून 

मान खाली घालून 

हळूच ओठात पुटपुटली 

"माझं तुझ्यावर प्रेम आहे "

दिवस मात्र रागावला 

रागानं लालबुंद झाला 

"हिम्मत कशी झाली, 

मला असं विचारायची? "

रात्र आता घाबरली 

धीर करून म्हणाली "का ?"

दिवस छाती फुगवून म्हणाला, 

"मी गोरा तू काळी, 

माझ्यात चैतन्य,  

तुझ्यात सुस्ती, 

माझ्यात श्रीमंती, 

तुझ्यात गरिबी".

"पण लोक म्हणतात 

प्रेम आंधळं असते? "

रात्र रडवेली होऊन म्हणाली. 

"प्रेमात रंग रूप नसतं 

गरीब श्रीमंत नसतं.. "

दिवसाला तिची दया आली, 

"अग वेडे ते प्रेम संपल, 

गेला तो जमाना, 

आता सगळ्यांना फक्त, 

पैसा है कमाना, 

ते प्रेमी मेले, 

फक्त नावं राहिली त्यांची, 

कर्तृत्व नाही राहिले, 

आताच्या प्रेमाच्या बाजारात, 

ते सुद्धा हरवले, 

आत्ताच प्रेम डोळस असत, 

आधी पैसा बघून, 

मगच प्रेम होते."

रात्र रडत म्हणाली, 

"माझ्यावर तुझं खरंच प्रेम नाही? 

दिवस खदखदून हसला 

हसता हसता म्हणाला, 

"वेडे मी तर तुझी मस्करी केली, 

आपण दोघे तर, 

एकमेकांसाठीच आहोत, 

माझ्याशिवाय तू नाहीस, 

तुझ्याशिवाय मला अर्थ नाही, 

म्हणून काय प्रेम 

व्यक्तच करायला हवे.....असेही नाही"

आता रात्र हळूच हसली, 

दिवसाला शुभरात्री म्हणून, 

स्वप्नात त्याच्या हरवली.... !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance