अडगळ
अडगळ


हळूच मनात डोकावून पाहिलं,
खूप अडगळ होती,
सर्व काढून टाकली...
पण एक मात्र निघतच नव्हती,
मला माहितीय ती आता,
माझी राहिली नव्हती...
तरीही का कोणास ठावूक?
माझ्या मनाला ती माझीच वाटत होती...
या वेड्या मनाला मी कसे समजावू???
ती आपल्या नशिबातच नाही...
पण तेच मला विचारत होतं
ती तुझी का झाली नाही?????