STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

माणूसकीचा मृत्यू

माणूसकीचा मृत्यू

1 min
11.5K

भावनाशून्य झालास का 

का निर्ढावली इंद्रिये तुझी 

माणसासारखा माणूस तू

दानवासारखा वागलास तू 


दान दयेचे विसरलास 

केलीस मोठी चेष्टा तू 

मुक्या जनावराच्या 

जीवाशी खेळलास तू 


विकृती घडली हातून तुझ्या 

कसे घडेल प्रायश्चित्त 

जगा आणि जगू द्या 

यातच असे साऱ्यांचे हित 


नव्हता गुन्हा त्या बालजीवाचा 

ना पाहिले हे सुंदर जग

धगधगत्या ज्वाला सामावून 

उभी माऊली धरूनी तग 


माणुसकीचा घडला मृत्यू 

उभारलीस तू स्वतः चिता 

निसर्ग देईल यावर न्याय

तोच साऱ्या कर्ताकरवता


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Tragedy