STORYMIRROR

Sangeeta Vora

Others Tragedy

2.9  

Sangeeta Vora

Others Tragedy

आशेवर आता जगायचं !

आशेवर आता जगायचं !

1 min
22.3K


उघड्या डोळ्यांनी पहायचं

कुठवर सहन करायचं !


खऱ्याला मिळेना मान

खोट्याची वेगळी शान

नुसतंच बघत रहायचं

कुठवर सहन करायचं !


मेहनतीला मिळेना भाव

दलालच खाती सर्व राव

समजूनही गप्प बसायचं

कुठवर सहन करायचं !


स्त्रीचा पदोपदी अपमान

म्हणायला देवीचा मान

किती वर्षे असं चालायचं

कुठवर सहन करायचं !


सत्य दाखविल ताकद

खोट्याला करील गारद

भविष्यात आहे हे घडायचं

या आशेवर सहन करायचं !


Rate this content
Log in