पावसाची विनवणी
पावसाची विनवणी
1 min
12.8K
वेळेवर येऊन पावसा तू रे
आमच्यावर कृपा कर
ऋणी राहू जीवनभर.
सगळे कष्ट आमुचे पावसा
फळाला येतील रे
ना कर्ज घेणे ना ते फेडणे
चक्रातून पार कर.
पिके येतील जोमदार
भाव येईल दमदार
जगण्यास अर्थ मिळेल
ना दुःख असेल ना चिंता असेल
परिवार आनंदीत कर.
कधीतरी जीवनात
सुख आम्ही पाहू
जगण्याचा आनंद घेऊ
तुझ्याच हातात आहे हे आता
आमच्यावर मेहरबानी कर.
ऋणी राहू जीवनभर.
