नयन
नयन
1 min
27.1K
तुझ्या मनातील भाव
नयन तुझे सांगती
तू शब्दाने नाही म्हणतेस
नयन तुझे 'हो' म्हणती
नयन तुझे सांगतात
तुला थांबायचे आहे
अन् तू मात्र म्हणतेस
तुला लगेच जायचे आहे
तुझ्या अशा लपाछपीने
झालो मी घायाळ
लाखात तू माझ्यासाठी
हो जराशी मवाळ
ठाऊक तुला दुनिया माझी
नयनात तुझ्या लपलेली
तरी येता समोर मी
पापणी तुझी झुकलेली
