आदर्श राजा
आदर्श राजा
महाराष्ट्राच्या कणाकणात
सदोदित जो वसतो आहे
प्रत्येकाच्या मनामनात
आजही तो जगतो आहे
शहाजीचे पुत्ररत्न हे
जीजाऊ त्यांची माऊली
शुभमुहूर्ती जन्म जाहला
भाग्याची पहाट झाली
राजा शिवाजी जनांचा राजा
हिंदवी स्वराज्य ज्याने स्थापिले
रयतेला संकटापासून दूर करत
पराक्रमाने हवे ते मिळविले
मावळे घेतले साथीला
स्वराज्य तोरण बांधले
एक एक गड सर करत
नित्य प्रगती होत राहिली
परस्त्री ज्यास मातेसमान
ह्दय कोमल कर्तव्यकठोर
नजर अशी पारखी की
मनाचा वेध घेई आरपार
भवानीमातेची क्रूपा जयावर
शिवबा झाला छत्रपती
महाराष्ट्राचा हा कलीजा
त्याचे गुण मी गाऊ किती!