स्वाभिमानी रमाई माय
स्वाभिमानी रमाई माय


भारत देशाचे महान शिल्पकार
माता रमाबाईचे साथीदार झाले
पाहून दलित हाल आंबेडकर कुटुंब
निर्विवाद अन्यायाविरुद्ध उभे ठाकले
आधीच घात झालेल्या कुटुंबाची
कोवळ्या वयातच आई झाली
स्वतःच्या सगळ्या इच्छांची तिने
स्वाभिमानाने दिली तिलांजली
अन्नाला महाग झालेली माय
पतीच्या शिक्षणासाठी झटली
त्यांच्या विदेशाच्या निर्वाहासाठी
स्वतः खाचा खात कर्तव्यात झुरली
निष्ठेने जेव्हा समाजसेवेचा प्रण
स्वीकारली बदलाची अखंड लढत
पती भीमरावांची माऊलीने केली
सदा कष्टात जीवन जगत सोबत