लाॅकडाऊन
लाॅकडाऊन


कोरोनाने चढवला वेष
लॉकडाऊन झाला देश
चीन अमेरिका किंवा असो इटली
सगळ्यांचीच वाढली भीती
महामारी काही ऐकेना
लॉकडाऊनची तारीख काही संपेना
भवितव्याच्या विचारात
डोळ्यातले अश्रू थांबेना
पाहून ही स्थिती मजला
वाटते जाऊ देवा घरी
पण देवही आहे
सध्या बंदिस्त गावो-गावी
कोरोनाच्या महामारीत
गेला त्या मजुरांचा जीव
एक एक दाण्यासाठी
तेव्हा का नाही आला तो देव.....?
भले मोठे प्रश्नचिन्ह
फिरते माझ्या डोक्यात
स्वतःला मोठे समजणारेसुद्धा
आज का आहे घरात....?
कष्टी मजूर बिचारे निघाले पायी
त्यांचे दुःख नाही दिसले कोणाच्या डोळी
पण गेले होते जे देश सोडून परदेशा
ते मात्र पोचले सुरक्षित स्वतः घरी
कोरोना एक छोटासा विषाणू
दाखवली त्याने भल्या-भल्यांना
मसणवाट
आत्मनिर्भर राहल्याविना नाही आता पर्याय
कोरोनाला नष्ट करण्याचा आहे हा एकमेव उपाय
केलेली पापे भोगावीच लागतील पण
कोरोनाची महामारी लवकरच संपेल
सध्या आपल्या संयमाची आहे परीक्षा,
उगाचच नको महारोगाची भिक्षा
लवकरच होईल अनलॉक हे जग
उघड्या डोळ्यांनी जगायचे नव्याने
नवीन मोकळा श्वास घेत
तेव्हा जगाचे पालटलेले रूप बघ