हे गणराया
हे गणराया
पाहता ते रूप
होती सर्व चिंता दूर
वाटते तुजला भेटावे
मन मोकळे करावे
डोळ्यापुढे प्रकाशाचा झोत दिसू दे
इडा-पिडा, कोरोना नष्ट होऊ दे
ढोल ताशाच्या गजरात
नाचून बेधुंद होऊ दे
तुझ्या कानी पोहोचलीच असतील
कोरोनाची गाऱ्हाणी
तूच राख भक्ताची जीवन कहाणी
हे गणराया कोरोना नष्ट कर
भक्ताचे रक्षण कर
अर्पण करते तुजला
सुमनाची माळ