मी कसा तू कसा
मी कसा तू कसा


अरे जीवना ऐकतोस थोडा
पाहा ना मी कसा तू कसा
कधी वाटतं तू हिंस्र वाघ मग
गवतामध्ये दडलेला मी ससा
जन्मताना काय तर आलोच
मी रिकाम्या हातांनी तुझ्या जगात
पैशासाठी सारी जिंदगी गेली आणि
नंतर कळले कफनाला नसतो खिसा
काय काय कुठे कशात बरे
मिळेल सुख म्हणूनच तर
पिंजून काढल्या मी ही
इतरांसारख्या दाही दिशा
जीवना ऐकतोस का मला
पाहा ना तू कसा मी कसा
उडणारी विहंग सारी
होती ती त्यात
टिकलो बनून फुलपाखरु कसाबसा
शमवायला भूक विषयांची
पिलो अमृत जरी तरी पण
आजवरी राहिल मग अतृप्त
का राहिला हा माझा घसा
मी समजलो युद्ध तुला पण तू
निघालास भातुकलीचा खेळ असा
चिडलो कधी रागावलो कधी हसलो
कधी तर तू पण उडवलास माझा हसा
हो आता सारेच मान्य मला
थांब ना अजून थोडावेळ तरी
मला एकटेच सरणावरती सोडून
मोडून हा डाव जातोस तू कसा!!!