भेटलाच नाही
भेटलाच नाही


होती रस्त्यावर गर्दी माणसांची बहुत जास्त
पण त्या गर्दीत माणूस मला भेटलाच नाही
प्रयत्न तर केलीत त्यांनी ठिणगी पडली
पण वणवा तर कधी तो पेटलाच नाही
सारी भाबडी भक्त येत होती मंदिरात
पण विटेवरूनी विठुराया हटलाच नाही
घरट्यात पिल्लांना घास भरवणारी चिमणी
मायेचा पान्हा तिचा कधी तो आटलाच नाही
आयुष्याच्या प्रवासात लोक येत राहिले जात
राहिले पण आपला मला कुणी वाटलाच नाही
घेत राहिलो मी शोध नेहमी
क्षितीजाचा काय कल्पना ती
की सत्य आकाशातील ढग
जमिनीला कधी भेटलाच नाही