पैसा
पैसा


देवा तुझ्या दरबारी
पाप पुण्या मिळे ठाव
तिथे होई मोजमाप
रंक असो कोणी राव ||१||
पृथ्वीवर पैशालाच
मानतात सारे देव
पैसा हा सर्वस्व जगी
मिळे पैशालाच भाव ||२||
सारी नाचते जनता
पैशाचाच तालावर
त्याचेच रे गाणे आहे
सर्वांच्याच ओठावर ||३||
पैशापुढे माणुसकी
येथे ही कवडीमोल
सर्वजण फिरतात
त्याच्यासाठी गोल गोल ||४||
घ्यावी लागते काळजी
नातीगोती जपताना
अनुभव येई महा
दूर आपले जाताना ||५||
चार भिंतीत जगता
न्याय विके बाजारात
मोठी ताकद पैशाची
अन्याय हा चव्हाट्यात ||६||
पैशामुळे शेतकरी
होतो हा कर्जबाजारी
निराशेच्या त्या छायेत
गळा अडकवी दोरी ||७||
मोठा यायचा पाऊस
जेव्हा पैसा होता खोटा
मागे पाऊस ही नोटा
नाही पैशाला या तोटा ||८||
नको दिमाख पैशाचा
नाशवंत हा पैसाच
नाही कळत जन का
मानती देव यालाच?