विस्मृती
विस्मृती


विसर तू मला
झरा आरस्पानी, इथे रक्ताळलेला ।
स्मरणाच्या अनंत मरणं जगून
दे विस्मृतीचा, क्षणिक विसावा ।
ऐक त्या हाका माळरानाच्या,
दरी दरीतुन ओ देणाऱ्या ।
हास्यध्वनी तुझे निनादी
गाबुळल्या जांभूळी
वैशाख वणवा
सावली धरी ।
कितीदा वेचला मोगरा
मंदगंध सोनचाफा
मांडव बोलघेवडा
वेणी चंद्रमोरी
अजून ती।
स्पर्श हूर हूर, अबोल गाणे
रातराणी का रुसली, कोण जाणें।
प्राजक्त दरवळे, तिन्हीसांजे
दिनरात्र मिलनासवें।
रात्र बहरली आठवणी उगाळी
डोळ्याची ताटी सताड उघडी ।
विनवणी देवी हात जोडुनी
स्मृतीच्या अभिशापाला
विस्मृतीचा उ:शाप मिळोनि ।