ग्रासणारी वेदना
ग्रासणारी वेदना
कसं सांगू मी तुला, कसं समजावू मी तुला
आत कुठं तरी खोल, गात्रन गात्र आक्रंदून
आतड्या पिळवटून,
माझा हुंकार मला संकेत देतोय!
काहीतरी होतेय खास, अदृश्य बदल नखशिखान्त
शब्दात न समावणारा, माझंच मला न समजणारा!
ठसठसणाऱ्या वेदना आणि त्याच्या हिरव्या शेंदरी
कळा, उमटू लागतात बाह्यरंगात क्षणोक्षणी
पेशी दर पेशींत!
….अन एका अभद्र काळरात्री अंतरंगी बदल
घेतेच एक दृश्यरुप, करीत उद्रेक ज्वालामुखीचा!
गात्रन गात्र पेशी न पेशींचा होतोय महास्फोट
परिवर्तित काया, जाळीत माया!
…..त्यावेळी अकल्पित कल्प
अळेबळेच जन्म देते एका अनंत वेदनेला,
मस्तकी अमरत्वाचा अभिशाप मिरवीत
…..ही ग्रासणारी वेदना!