गीत हरवलेले
गीत हरवलेले
गीत ते हरवलेलेे,
स्वर मुके मुके
धूसर त्या आठवणी,
शब्द शब्द रीते
चिंब चिंब ओली रात्र,
आसू असू म्हणे
आरक्त हात तुझे,
ओंजळीत नक्षत्रांचे ताटवे
<
/p>
छंद छंद उन्मत्त,
तृप्त रंध्र रंध्र
धुंद पहाट गुलछबी
श्वास श्वास यौवनगंधी
कर्म कर्म अखंड,
नश्वर नश्वर शतखंडी
निमाले तरू अखेरी,
आदित्यचक्षु पैलतिरी