STORYMIRROR

sitaram Redkar

Inspirational

3  

sitaram Redkar

Inspirational

आभाळमाया

आभाळमाया

1 min
12K


काळोखाचा रात्र पहारा 

खिन्न आक्रोश, कर्णभेदी

ओघळती नेत्रीं प्रजन्य धारा

स्मृतींच्या वीज लहरी ।


काळीज फाटले, छत्र हरपले

दाटली कातरवेळा 

फिरतो विस्तीर्ण, भुईरिंगण

एकाकी सांबभोळा ।


वनी वासरू हंबरते 

जोजवतें मंजुळ पावा

वेडी माय पान्हाळते

करीं कृष्ण धावा ।


विश्वासाची डोलकाठी 

शिडं कष्टाळू, निर्धाराचा सुकाणू

आभाळमाया धरी सावली

हरी माझा कनवाळू ।


ललाटरेषा माझ्या 

पुसट, जाळी पिंपळपानी

मन गाभारी आता 

मंद मंद तेवते समई ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational