सृजनोत्सव
सृजनोत्सव
1 min
23.5K
शब्दांची बंदिशाळा, त्याला अर्थाचे पंख दे ।
धवल ढगांची ओळ, त्यास श्यामरंगी किनार दे ।
वैशाख जळतोय, गुलमोहर कधीचा फुलतोय
प्रियतमाच्या विरहात, यौवन जाळतोय ।
शब्द सांडले, क्षितिजापार विखुरले
उमटली अंबरी शब्दचित्रे
गरजू दे, बरसू दे धारा,
घडो सृष्टीचा, अवघा आनंदसोहळा ।
...आणि अवचित समयी,
श्यामल मेघ दाटले नभीे
प्रीत विराणी माझिया प्रिया,
झाली रंगबावरी।
बेधुंद झाला मोरपिसी फुलोरा
तृप्त धरापोटी, पाचूचा वनावळा ।
उमलली कळी, फुलपाखरू झाली
झुळझुळ जळी, ना ना रुपेरी कळा ।
उत्सव हा सृजनांचा, नवचैतन्याचा
शब्दफुलें गुंफूनी गळा, वसुंधरा गाते लेकुरवाळा।