अवशेष
अवशेष


तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा
माझ्या मनपटलावर कोरल्या
आठवणींच्या अवशेषांना
काळाने उगाच जपल्या ।
कधी अवेळी कातरवेळी
तरंग उठले काळ्या डोही
कंप जाहला खोल तळी
दबली श्वापदे उचंबळून आली ।
त्यावेळी तिन्हीसांजा आल्या
प्रकाश गवाक्षातून हद्दपार झाला
सूर्यही कमानीतून
दिसेनासा झाला ।
पंख फडफडून जोरात
दाट सावली धरू लागली
एक अनामिक
अस्वस्थता दाटून आली ।
ह्या उध्वस्त वाड्याचा
आता मी केवळ द्वारपाल
किती काळ जपावं
अवशेषांचे हे भग्न महाल ।