STORYMIRROR

काव्य रजनी

Tragedy

3  

काव्य रजनी

Tragedy

घात

घात

1 min
11.9K

घात कसा केला बघ

सख्ख्या त्या भावांनी

बापाची ती शेती मागून

केली हो वाटणी...


असा कसा भाऊ राया

करतो पैशापाई

विसरला होती त्याच्याही

गोठ्यात गाई


घात जेव्हा होतो

सख्या हो भावात

गणगोत हसती सारे

जगाची ही रीत


घात करुनी स्वतःच

घरासाठी लढे

कसा भाऊ दुरावले

त्यांना नाही कळे


घात कसा होतो मग

घराला जाई तडे

आई बापाची वाटणी

जाईल कुणाकडे


घात असा होतो 

मुले जेव्हा करती भांडण

आई बाप सांभाळणं

त्यातच कांडण


घात होतो आई बापाचा

काळजाला पडती घरे

मूल नाही सांभाळत

जाई उडून पाखरे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy