आता मी...
आता मी...
फसव्या तुझ्या बोलण्याला, आता मी भुलणार नाही
सोबत चालली तरी तू, रस्ता एक असणार नाही
मोहक तुझ्या हास्यात आता मी गुंतणार नाही
नशिल्या डोळ्यात तुझ्या आता बहकणार नाही
वेड्या स्वप्नांच्या जगात आता मी जगणार नाही
रुतले किती काटे पायात, मोजदाद कधी केली नाही
कुठून कुठे आलो, माझ्यातला मी मला कधी सापडला नाही
सांभाळ तुझे केश संभार, आता यात अडकणे नाही
घोर जीवाला लावून, रक्तबंबाळ मी होणार नाही
आठवणीचे तुकडे विखुरले होते कधी काही
पुन्हा त्या तुकड्यांना आता सांधणार नाही
दूर राहिला गाव तुझा, पुन्हा तिथे येणे नाही
पायांनासुद्धा उमजून गेले, आता ही वाट आपली नाही..!

