प्रगती
प्रगती


घड्याळात वाजले दोन
बाबांचा आला टेलिफोन
म्हणता म्हणता हे गाणे
आला हातात मोबाईल फोन
कौतुक भारी मला लहानपणी
यायचा टेलिफोन जेव्हा घरी
न्याहाळायचो निरखून रंग
हात लावला जर राग यायचा भारी
गेले दिवस उत्साहाचे
आता सर्वांकडे मोबाईल
मजा ना राहिली कोना
पैसा करतोय मन सैल
साधा टेलिफोन ताणमुक्त
मोबाईल झालाय ताप
सतत हातात घुटमळतो
वेळ फुकट जातो अमाप
सोनेरी होते ते जीवन
माफक त्या गरजांचे
ताण नव्हता कसला
आज दुःखी जीवन माणसाचे