सलाम योध्द्याला
सलाम योध्द्याला


सलाम तुमच्या कार्याला
सलाम तुमच्या सेवेला।।ध्रु.।।
तळ हातावर घेऊन प्राण
प्रसंगी प्राणांचे बलिदान
दंडवत तुमच्या हिंमतीला
सलाम तुमच्या सेवेला
सलाम तुमच्या कार्याला (१)
सलाम 'कोविड-१९'योध्द्याला
सच्च्या देशभक्त नागरिकाला
सलाम तुमच्या सेवेला
सलाम तुमच्या कार्याला (२)
घरदारापासून राहूनी दूर
कोविडग्रस्तांच्या सेवेसी तत्पर
सलाम तुमच्या सेवेला
सलाम तुमच्या कार्याला (३)
कधी न केला स्व-विचार
कधी न केला कार्य प्रचार
ऐसा भारतभूषणाला
सलाम तुमच्या कार्याला (४)