STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Inspirational

3  

RohiniNalage Pawar

Inspirational

नातं बहीण भावाचं

नातं बहीण भावाचं

1 min
59

अतूट पवित्र नात्याच एक बंधन

घेऊन येतो सण श्रावण,

साजरा करतात भाऊ-बहीण

म्हणतो आपण त्याला रक्षाबंधन...


भांडण असतं ,रुसवा असतो

पण कधीच नसतो त्यात दुरावा,

सगळ्या नात्यांना पुरून उरेल

एवढा असतो त्यात गोडवा...


भाऊ असो वा बहीण दरवर्षी

या दिवसाची वाट आतुरतेने पाहतात,

त्या दिवशी झालं गेलं सगळं विसरून

आनंद साजरा करतात...


कधी नजर ना लागो कोणाची

या गोड नात्यातील बंधनाला,

युगे न युगे चालू राहील ही साखळी

अतूट पवित्र नातं चिरंतर ठेवायला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational