आई...
आई...
तू आहेस गं
सावली सारखी पाठी माझ्या
म्हणून भीती नाही
तू आहेस गं
नभा सारखा दिलासा देणारी
म्हणून काळजी नाही
तू आहेस गं
समुद्रासारखी भव्य माया करणारी
म्हणून चिंता नाही
तू आहेस गं
अंधाराला बाजूला सारून प्रकाश आणणारी ज्योती
म्हणून काळजी नाही
तू आहेस गं
चुकल्यावर शिक्षा करायला
म्हणून अपराध नाही
तू आहेस गं
म्हणून मी आहे
म्हणून माझं अस्तित्व आहे
तू आहेस गं
तुझ्याशिवाय मी अपूर्ण
तू असताच मी भासते पूर्ण....!
