STORYMIRROR

SAHIL MARATHI POEMS

Inspirational

3  

SAHIL MARATHI POEMS

Inspirational

शिर्डीची साई माउली

शिर्डीची साई माउली

1 min
283

शिर्डीची साई माउली 

आम्हा भक्तांची सावली..🙏

ह्या संसर्गजन्य वेळी

अनेक समाज घटक होऊन

भक्तांच्या मदतीस धावली.. 

कधी पीपीई किट घालून 

डॉक्टर रूप धारण केल 

आणि दिलीस नवी संजीवनी.

तर कधी पोलीस होऊन शिस्त लावून 

स्वतःच्या जीवाची लावलीस बाजी. 

म्हणूनच "शिर्डीची साई माउली 

आम्हा भक्तांची सावली... "🙏


प्राणवायू ही तूच..

ज्यानी हजारो प्राण वाचली 

तर कधी पालिका कर्मचारी होऊन 

स्वतःच स्वछता केली.

संकटात आम्ही त्रासून जरी म्हटलो

 ह्या जगात देव नाही साई नाही.. 

तेव्हाच.. तू अनेक प्रसंगी

 तुजी प्रचिती दाखवली..म्हणूंच 

"शिर्डीची साई माउली आम्हा

 भक्तांची सावली.."🙏


झाला जरी संसर्ग भिऊ नका..

 घ्या लस साई नामाची ..

ज्याने लाभेल अनुभूती

 अमृत्व मिळाल्याची..

दुःख जरी आले तरी ठेवा

 मनात श्रद्धा व सबुरी

 ज्याने मिळेल कधी ना कधी 

सुखाच्या दरबाराची किल्ली..

कारण आहे "शिर्डीची साई माउली...

तिच्या भक्तांची ती सावली..."🙏


जेव्हा शिर्डीत आली होती महामारी 

पिठरूपी दिली होती संजीवनी..

आता हि नक्कीच दाखवेल मार्ग..

एकदा लावून पहा कपाळी उदी बाबांची..

तुमचा मी भार वाहीन सर्वथा

 नव्हे हे अन्यथा वचन माझे 

अस वचन जिने दिले तीच वाचवेल 

साऱ्यांना ह्या संसर्गातूनि..म्हणूनच 

माझी शिर्डीची साई माऊली

आहे भक्तांची सावली... 🙏


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational