जगी साईने सर्व धर्म एकची जाणिल
जगी साईने सर्व धर्म एकची जाणिल
!! जगी साईने सर्व धर्म एकची जाणिले !!
ज्याने अस्पृश्याससुद्धा जवळ केले
हो त्यांनीच धर्माचे भेदभाव मोडले
हिंदूस सहजच राम राम म्हटले
तर यवनास अल्लाह मलिक सांगितले
ह्याच साईने आयुष्य मशिदीत काढले
एका मशिदीस.. द्वारकामाईं असे नाव दिले म्हणूनच
जगी साईने सर्व धर्म एकची जाणिले
कधी यवन कधी हिंदू एकाच थाळी अन्न ग्रहण केले
थोडक्यात काय..अन्न पूर्ण ब्रह्म.. हेच साईने शिकवले
कठीण काळात माणसानेच माणसाच्या मदतीस यावे सांगितले
जाती धर्मा पलीकडले प्रेम साईने लोकात रुजवले म्हणूनच
जगी साईने सर्व धर्म एकची जाणिले
जीवनभर साई गोर गरिबांसाठीच झटले
मग हेच विविध धर्मीय प्रांतीय लोक साईस शरण आले
म्हणतात देव तिथेच जिथे ऐक्यता असे
तसच साई तिथेच जिथे धर्म पलीकडे माणुसकी टिकविले कारण
जगी साईने सर्व धर्म एकची जाणिले
जाती धर्माचा भेदभाव करणाऱ्या या जगात
साई तू पुन्हा रुप धारण करावे निदान तुझ्या मुकी तरी
माणसास पहिला माणूस मग त्याची जात व धर्म हे कळावे
संतांच्या मांदीयाळीत साई असे संत झाले
सर्व धर्म समभाव ह्या वाक्यास लोकात पुरेपूर रुजवले म्हणूनच
जगी साईने सर्व धर्म एकची जाणीले
