STORYMIRROR

SAHIL MARATHI POEMS

Inspirational

3  

SAHIL MARATHI POEMS

Inspirational

संपवाल का हा संसर्ग साई

संपवाल का हा संसर्ग साई

1 min
180

संपवाल का हा संसर्ग साई 

यातनांचा कळस गाठलाय ओ साई 

कधी प्राणवायूसाठी 

तर कधी औषधांसाठी माणसं 

दागवतायत हो साई 

संपवाल का हा संसर्ग साई 🙏


हॉस्पिटल मध्ये जावा म्हटलं

तर बेड नाही. बेड कदाचित 

मिळाला तर सामन्यांना 

बिलाचा रेट देखील परवडत नाही 

मग माणसाने कोणाकडे पाहाव

हेच कळत नाही 

सांगान संपवाल ना हा संसर्ग साई.🙏


माणूस आपल्या माणसं सोबत सुद्धा 

परक्यासारखा वागू लागलाय 

संसर्ग झाला कि आपला मित्र सुद्धा 

आपल्याला दुश्मन म्हणू लागलाय 

माणूस वाईट कि संसर्ग हाच प्रश्न पडू लागलाय 

हि वेळ आता नाही सहन होत साई 

संपवाल ना हा संसर्ग ओ साई 🙏


म्हणतात विज्ञान संपत तिथे 

अध्यात्म चालू होत 

ह्याच वाक्याची प्रचिती देताय का साई 

तस असेल तर आमच विज्ञान हरल

आता तुम्हीच अध्यात्म दाखवा ओ साई 

ह्या वादळातनं ह्या जगाची नाव

सावराल ना साई 

हा तांडव संसर्गाचा शांत कराल ना साई 

खरंच सांगा संपवाल ना हा संसर्ग साई 🙏

संपवाल ना हा संसर्ग साई🙏


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational