STORYMIRROR

SAHIL MARATHI POEMS

Others

4  

SAHIL MARATHI POEMS

Others

आस साई पालखीची एका निरंतर

आस साई पालखीची एका निरंतर

1 min
217

पालखी म्हणजे जणू दुसरी दिवाळीच साई भक्तांची 

एकवेळ दिवाळी नसली चालेल हो पण पालखी जास्त जवळची 

जशी मोरास ओढ वर्षातील चिंब पाऊसाची 

तशीच साई भक्तास त्याच्या साई देवाच्या पालखीची 

पालखित अमीर असो वा श्रीमंत समान जागा सर्वांची 

आस साई पालखीची एका निरंतर प्रवासाची..


प्रवास होताच चालू आनंद भिडे गगनाशी 

मग हीच वाट शिर्डी जाण्याची हळूच चाहुल देई मनाशी 

साई नामाचा गजर करत पालखी पुध्ये सरशी 

पालखी खांद्यावर घेताच सारी दुःखे लयास जासी 

दंगून साई प्रवासात ना परवा झोपेची ना भुकेची 

आस साई पालखीची एका निरंतर प्रवासाची..


चालता चालत आले भक्ताच्या पायाला ते फोड 

साई भक्त म्हणतो...तुज्या कृपेच्या छायेत हे फोड हि वाटती गोड 

वळणाचे रस्ते पाहताच चाहूल कसारा घाटाची 

त्याच प्रत्येक वळणावर भक्तास आतुरता साई भेटीची 

हेरवी काही पाउलांचा कंटाळा गाठी शिर्डी लांब पल्याची 

आस साई पालखीची एका निरंतर प्रवासाची..


आणि नको असलेला दिवस शेवटी येतो

निरंतर वारीचे निरोप साई भेटींनी गोड होतो 

याच साठी केला होता अट्टहास ओळीची येते प्रचिती 

मग साईंची मूर्ती पाहताच मन होई एकाग्र चित्ती 

वेळ आता पुन्हा खांद्यावर घेऊन येईन सांगण्याची 

आस साई पालखीची एका निरंतर प्रवासाची....


आस साई पालखीची एका निरंतर प्रवासाची....

आस साई पालखीची एका निरंतर प्रवासाची....


Rate this content
Log in