STORYMIRROR

SAHIL MARATHI POEMS

Others

3  

SAHIL MARATHI POEMS

Others

पुन्हा ओढ साई भेटीची

पुन्हा ओढ साई भेटीची

1 min
248

पुन्हा ओढ साई भेटीची 

आठवणीतील शिर्डी पाहण्याची 🙏


म्हंटलं आता नाही साई..गाठी भेटी 

पण डोळे मिटताच येई स्वप्नी शिर्डी 

तीच द्वारकामाई तीच चावडी 

तरीही पाहण्याची गोडी निराळी 

साई अंतरी मग भीती कसली संसर्गाची  

पुन्हा ओढ साई भेटीची 

आठवणातील शिर्डी पाहण्याची.🙏


भक्तांची साईंशी जणू नाळच जोडली 

न जाताच शिर्डी. याची डोळा याची देही पाही 

युगे प्रज्वलित धुनी समर्थाची शिकवण देई 

न थांबता पुन्हा लढण्याची बुद्धी देई 

धुनी पाहताच.द्वारकामाईंत प्रवेशाची जाणीव होई.. 

पुन्हा ओढ साई भेटीची 

आठवणीतील शिर्डी पाहण्याची..🙏


दर गुरवारची पालखी नयन रमवी 

साक्षात साई आजही पालखीत विराजमान होई 

साई येताच शिर्डी नगरी प्रफुल्लीत होई 

जणू सुखाची झालर ओढून दुःख जाई..

हाच गुरुवार आतुरता वाढवी शिर्डी जाण्याची 

पुन्हा ओढ साई भेटीची 

आठवणीतील शिर्डी पाहण्याची🙏


आता मात्र आतुरता समाधी मंदिरास नेई 

रूप साईंचे पाहता भान हरपून जाई

एक टक पाहता कधी दिसे विठू माउली 

तर कधी वृन्दावनातील बाळ कृष्णाई 

वेळ परतण्याची येताच. बांध फुटे अश्रूंची 

पुन्हा ओढ साई भेटीची 

आठवणीतील शिर्डी पाहण्याची 🙏


Rate this content
Log in