Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepak Ahire

Inspirational

3.9  

Deepak Ahire

Inspirational

आई

आई

1 min
248


ते सुंदर जग म्हणजे आई असते

मुलांच्या विश्वात रमण्याची तिला घाई असते,

सुख-दुःखात साथ देणारी ती ताई असते,

ते सुंदर जग म्हणजे आई असते

नवऱ्याचे विश्व समृद्ध करणारी ती बाई असते, 

संसारासाठी जीव ओवाळणारी ती माई असते,

ते सुंदर जग म्हणजे आई असते*

जिच्यामुळे कुटुंब एकरूप होते अशी ती साई असते, 

मातृत्व सफल करणारी ती एक दाई असते, 

ते सुंदर जग म्हणजे आई असते

छत्रछाया देणारी ती भारवाही असते,

कुटुंबाचा आधारवड होणारी ती सावली असते,

ते सुंदर जग म्हणजे आई असते*

आंधळ्याचे डोळे तर लंगड्याची पाय असते,

दुधाची साय तर गाईची माय असते,

ते सुंदर जग म्हणजे आई असते

हंबरड्याचा पान्हा तर कुटुंबाचा कणा असते, 

पडणाऱ्याचा टेकू तर उधळणाऱ्याचा वारा असते,

ते सुंदर जग म्हणजे आई असते

पावसातली गार तर जीवनाचे सार असते,

वादळं सोसूनही आनंद देणारे भांडार असते,

ते सुंदर जग म्हणजे आई असते

मातीशी इमान राखणारी ती भूमाता असते,

सेवा, समृद्धी, त्यागाची ती मूर्तिमंत रूप असते,

ते सुंदर जग म्हणजे आई असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational