आई म्हणजे
आई म्हणजे
आईसाठी काय आणि कसे लिहू
आईसाठी पुरतील इतके शब्द कसे आणू
आई म्हणजे उन्हातली सावली
आई म्हणजे माझी विठू माऊली
आई म्हणजे मंदिराचा कळस
आई म्हणजे माझ्या अंगणातली तुळस
आई म्हणजे हरीभजनातील संतवाणी
आई म्हणजे थंडगार माठातलं पाणी
आई म्हणजे वातावरणातील प्राणवायू
आई म्हणजे दृढनिश्चयाचा महामेरू
