तुझ्याविना मी काहीच नाही ग आई
तुझ्याविना मी काहीच नाही ग आई
माझा जन्म तू आई
माझा श्वास तू आई.
तुझ्याविना मी काहीच नाही ग आई .
कष्ट केले तू भर पावसात.
भर उन्हात चिंब भिजली कष्टाच्या घामानं.
तुझ्याविना मी काहीच नाही ग आई.
तुझ्यामुळेच मी पार करू शकलो
शिक्षणाची शिडी
समाजात आहे मानसन्मान फक्त तुझ्यामुळेच ग आई.
तुझी वाट पाहून सायंकाळ झाली.
आता तरी घरी ये ना ग आई.
तुझ्याविना मी काहीच नाही ग आई