बालपणीची दिवाळी...!
बालपणीची दिवाळी...!


बालपणीची दिवाळी....!
बाळ पणीची दिवाळी
भल्या पहाटे जागे आळी
प्रतिन गावची पहिला
हंतरुणात आम्हा ओवाळी
भिंतीला टेकून
ठाण मांडून बसायची
ओवाळणी तास भराने
चहा संगे आनंदाने घ्यायची
विठोबा मारुती जोत्या
आळीपाळीने तेल मॉलिश करायचे
आंघोळीला ताईने
फरफरटत न्हाणीत न्ह्यायचे
गरम कडत पाणी
डोक्यावर निर्दयी पणे पडायचे
तेंव्हा मायेचे दर्शन
थैई थैई नाचतानाच व्हायचे
डाळीचे पीठ आधी
नंतर चंदन साबण घासून व्हायचे
मुद्दाम गार गार पाणी
हौदातले डोक्यावर पडायचे
थंडी मी म्हणायचे
बाहेर पळण्याची घायी व्हायची
औक्षण झाल्यावर मग न्हाणीतून
नागड्यानेच हकालपट्टी व्हायची
जरा काहीतरी करून मग
नवे कपडे वाढत्या अंगाचे चढायचे
बुजगावण्याचे ध्यान नंतर
गल्लीतून देव दर्शनाला जायचे
अशी दिवाळीची सुरुवात
आजही गोड गोड स्मृती जागवते
त्या मायेच्या ओलाव्याची आठवण
अजूनही दिवाळीत न्हाऊ घालते...!