रंग नवरात्रीचे
रंग नवरात्रीचे


रंग नवरात्रीचे
नऊ रंग असे
पिवळा दिसे
शोभून ।।
नऊ दिवस
उपवास करे नारी
देवीच्या दरबारी
खेळती ।।
बसून वाघावर
हाती त्रिशूळ घेऊन
करती रक्षण
भक्ताचे ।।
सांज सकाळी
घेऊन तुझी आरती
लाऊन फुलवाती
समईत ।।
नवरात्र महोत्सव
करीन मी साजरा
माळीन गजरा
तुझ्यासाठी ।।
दुर्गा माते
आले तुझ्या भेटी
नारळाची ओटी
भरीन ।।