कविता माझी
कविता माझी

1 min

6.8K
कविता माझी
तुझ्या भावनांची साद
कविता माझी त्याचा
मूर्तीमंत प्रतिसाद!
जीवन फुलवणारी
अशीच माझी कविता
वाटसरूला दिलासा देऊन
मनोधेर्य वाढवणारी कविता!
कवितेने दिले नाते
कवितेनेच शिकविले प्रेम
म्हणून जगणे झाले सुसह्य
तुमची माझी कविता सेम!
जीवनास अनेक
Advertisement
पैलू
कविता पाडत असते
कविता जगताना मी मात्र
कवितेतच मग्न होत असते!
कविता शिकवते बहरणे
कविताच देते बळ मारण्या भरारी
कविता होते जीवनाचे गीत
कविताच देते जीवनास उभारी!
कविता म्हणजे काय?
नेमके सांगता येत नाही
ती तर येते रोजच भेटण्याला
यात मात्र खंड पडत नाही!