हजडज्जड
हजडज्जड
कुठे नाही असे
सलणारे दुःख
फुलणारे सुख
आम्हा प्रती.
कुठे नाही असे
हताश होणे
उमलून येणे
फुलापरी.
कुठे नाही असे
क्षणही सुखाचे
आम्ही नशिबाचे
कफल्लक
कुठे नाही असे
वचना जागणे
बोलून वागणे
जिंदगीत
कुठे नाही असे
अस्थिर जीवन
आमची का जाण
कोणा नाही.
कुठे नाही असा
प्रेमाचा जिव्हाळा
लडिवाळ लळा
कुठे नाही.
