विरबाला
विरबाला
1 min
28.9K
कर मुक्त संचार तू
विहार तू याच जिवा
बंधनात तू नकोस अड़कू
करू नकोस शिव_शिवा
घे हाती क्रांतिची तलवार
शिरच्छेद करुनी वासनेचा
उंचच उंच शिखर गाठ तू
साहित्याच्या त्या क्षेत्राचा
श्वासात श्वास असे पर्यन्त
मी तुला गं जपतच जाईल
करील तुझी हर कामना पूर्ण
तुझी ऊर्जा मीच गं बनिल
निष्ठा तू स्व:तावर ठेव
जप आपल्या प्रतिष्ठेला
मोठे नाव कमव तू गं
विरासारखी हो वीरबाला
क्षण हे कधीच ना परतून येणारे
समोर तुझाच आदर्श लोकांनी ठेवावा
साहित्याची ज्योत अशी लाव की,
हात तुझा त्यात कोणी ना धरावा
तू आहेस मर्दानी नार
तू पुरुषार्थ लाव, पराक्रमाला
यश लोळण घेईल पायथ्याशी
सलाम करील महाराष्ट्र कांचन तुला
