स्वप्नांच्या वाटेवर
स्वप्नांच्या वाटेवर
स्वप्नांच्या वाटेवर
तू स्वप्नांच्या वाटेवर भेटलास
माझ्या तंबुत परतलय विश्व
तुझी मुळं पसरू लागली
या जीवनात...
हे ऐक सत्य आहे की
तुझा कुठलाच शब्द वर्ण भेदी नाही
जे काढून टाकण्याचे विचार यावेत
तसा तू कुठल्याच वजाबाकित
बसत नाहिस............
आणि तुला माझ्यातून
भागताही येत नाही..
मनसोक्त रीती झाले मी तुझ्यात
तू देऊ लागलास खांदा अन्,
मी न बघितलेले स्वप्न
ते असीम आसमंत.
तू कोसळ _कोसळ मनसोक्त माझ्यावर,
मलाही आनंद वाटेल तुला झेलण्याचा
तुझ्या सुप्त अंतरंगातल्या ,
भावनांचा पिसारा खुलू दे
माझ्या समोर.........
पण!
परागंदा होऊ नकोस हात वर करून
दुःखात खूप थीजलिय रे मी
आयुष्य भर
साऱ्या जगाला हसवतोस ना,......
मग मलाही सामिल कर थोड़ं
तुझ्या हृदयाच्या कप्यात
हसण्यासाठी..
